पुणे: महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून भररस्त्यात दाखविले गुप्तअंग

पुणे, ०५/०८/२०२२: दुचाकीवरून महाविद्यालयीन तरुणीचा पाठलागकरत भल्या सकाळ्या तरूणीच्यासमोर उभा राहून पँट काढत गुप्तअंग दाखवत अश्लील चाळेकरत तिच्याकडे शरिर सुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कोंढवा परिसरातील गोकुळनगर भागात घडली.

 

याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने तक्रार दिली आहे. त्यावरून दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा नोंद केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी पायी चालत निघाली होती.

 

त्यावेळी आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर दोघेजन पाठिमागून आले. त्यातील एकाने तिच्यासमोर उभा राहून पँट काढली व गुप्तअंग दाखवत तिच्याकडे शरिर सुखाची मागणी केली. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेले. पुन्हा दुपारी दोनच्या सुमारास तेच आरोपी तरुणीच्या महाविद्यालयाच्या गेटवर आले. त्यांनी गेटवरून आत तरुणीकडे पाहत तिचा पाठलाग केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.