पुणे: आंबील ओढा झोपडपट्टी विकसकावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

पुणे, दि. २२ जूलै २०२२: आंबेडकर चळवळीतीळ कार्यकर्ते किशोर मनोहर कांबळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन आंबील ओढा झोपडपट्टी चे विकसक केदार असोसिएट्सचे सूर्यकांत निकम, प्रताप निकम व सहकारी दिलीप देशमुख यांच्याविरोधात अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्‍ट) गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश व अप्पर सत्र न्यायाधीश पुणे रामटेके साहेब यांनी दिले आहेत. याचिकाकर्ते यांचे न्यायालयीन कामकाज वकील अंबादास बनसोडे आणि वकील आकाश साबळे यांनी पाहिले.

किशोर कांबळे हे गेल्या वर्षभरापासून आंबील ओढा सरळीकरण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालय, आणि दिल्ली सर्वोच्च न्यायालयात लढा देत आहेत. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील उर्वरित गरीब , दलित नागरिकांस न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. याचाच राग मनात ठेवून आंबील ओढा झोपडपट्टीचे विकसक केदार असोसिएट्सचे सहकारी दिलीप देशमुख यांनी किशोर कांबळे यांच्या विरोधात खोट्या तक्रारी दत्तवाडी पोलीस ठाण्यात केल्या होत्या.

त्या विरोधात किशोर कांबळे यांनी २७ डिसेंबर २०२१ रोजी दत्तवाडी पोलीस ठाणे आणि पुणे पोलीस आयुक्त दोन्हीकडे दिलीप देशमुख व बिल्डर केदार असोसिएट्सचे निकम पिता पुत्र यांच्या तक्रारी करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता किशोर कांबळे यांचे अर्ज दप्तरी दाखल केला. त्यामुळे कांबळे यांनी न्यायालयात खाजगी तक्रार केल्याने दिनांक १८ जुलै २०२२ रोजी जिल्हा न्यायाधीश व अप्पर सत्र न्यायाधीश पुणे रामटेके साहेब यांनी 156(3) अन्वये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अधिनियम 2015 भारतीय दंड संहिता अन्वये दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिलीप देशमुख व बिल्डर सूर्यकांत निकम, प्रताप निकम यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे आदेश दिले आहेत.