पुणे: लाचप्रकरणी आरोग्य निरीक्षकासह दोघांविरूद्ध गुन्हा

पुणे, ११/११/२०२१: वैयक्तिक टेम्पोने गोळा केलेला कचरा येरवडा कचरा डेपोत टाकण्यासाठी दर महिना पाच हजारांची मागणी करून लाच घेणाNया पुणे महानगरपालिकेतील आरोग्य निरीक्षकासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहात पकडले.

 

आरोग्य निरीक्षक स्वप्नील भगवान कोठावडे (वय ३२ ) आणि प्रकाश दौलत वाघचौरे (वय ५६) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तक्रारदार हे वैयक्तिक टेम्पोने येरवडा भागात कचरा एकत्रित करतात. गोळा केलेला कचरा येरवड्यातील कचरा डेपोत टाकण्यासाठी आरोग्य निरीक्षक कोठावडे यांनी खासगी व्यक्ती वाघचौरे यांच्या मध्यस्थीने तक्रारदाराकडे दरमहिना पाच हजारांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदाराकडून आज पाच हजारांची लाच घेताना वाघचौरे याच्यासह कोठावडे यांना पकडण्यात आले.