पुणे: सराईत तडीपार जेरबंद, युनीट एकची कामगिरी

 पुणे, ०८/०७/२०२२: शहरातील विविध पोलीस ठाण्यातंर्गत तब्बल २१ गुन्हे दाखल असलेल्या तडीपार  सराईताला युनीट एकने कसबा पेठ परिसरातून अटक केली आहे. काही महिन्यांपुर्वी त्याला पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यातून दोन वर्ष तडीपार करण्यात आले होते. मात्र, कोणत्याही परवानगीशिवाय तो पुन्हा शहरात येताच, गुन्हे शाखेच्या युनीट एकने त्याला जेरबंद केले.

योगेश बाबुराव पाटणे (वय ३२ रा. कसबा पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

सराईत योगेश गुन्हा करण्याच्या उद्देशाने  कसबा पेठ परिसरात असल्याची माहिती युनीट एकला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या  पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याचे उघडकीस आले. पुढील कारवाईसाठी त्याला फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,  सहआयुक्त संदिप कर्णिक,  अपर आयुक्त रामनाथ पोकळे,  उपायुक्त श्रीनिवास घाडगे,  एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ निरीक्षक संदिप भोसले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अमोल पवार, इम्रान शेख, अजय थोरात, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, निलेश साबळे यांनी केली.