पुणे: गहाळ झालेले ७४ मोबाईल दिले मिळवून, गुन्हे शाखेच्या युनीट दोनची कामगिरी

पुणे, २० जुलै २०२१ :- शहरात कामानिमित्त प्रवास करताना गडबडीत गहाळ झालेले तब्बल १३.४५ लाखांचे ७४ महागडे मोबाईल गुन्हे शाखेच्या युनीट दोनने पाठपुरावा करून नागरिकांना परत मिळवून दिले आहेत. या संदर्भात पुणे पोलिसांच्या वेबसाइटवर लॉस्ट अ‍ॅण्ड फाउंड पोर्टलवर तक्रारींची ऑनलाइन नोंद करण्यात आली होती.

नागरिकांनी ऑनलाइन तक्रार केल्यानंतर युनीट दोनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमंलदार समीर पटेल यांनी तांत्रिक विश्लेषणाची माहिती घेतली. त्यानुसार संबंधित मोबाईल कंपन्यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. गहाळ झालेले ७४ मोबाईल विविध भागांत कार्यरत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी मोबाईल वापरकतर्त्यांना संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर संबंधितांनी मोबाईल जमा केले होते. हरविलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्रनाथ देशमुख, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, एपीआय प्रकाश मोरे, वैशाली भोसले, यशवंत आंब्रे, अस्लम पठाण, किशोर वग्गू, संजय जाधव, नामदेव रेणूसे, मोहसिन शेख, चेतन गोरे, चंद्रकांत महाजन, उत्तम तारू, निखील जाधव, समीर पटेल, गजानन सोनुने, मीतेश चोरमोले, कादीर शेख, गोपाळ मदने, अजित फरांदे, अरूणा शिंदे यांनी केली.