पुणे: लग्नास नकार दिल्यामुळे महिला पोलीस उपनिरीक्षकाचे फोटो केले व्हायरल, रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे कृत्य

पुणे, ०६/०८/२०२१: लग्न करण्यास नकार दिल्यामुळे महिला पोलीस उपनिरीक्षकाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार सिद्धांत भगवान जावळे (वय ३०, रा. माजलगाव, बीड) याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. याबाबत सदाशिव पेठेतील २८ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला पोलीस उपनिरीक्षक तरूणी आणि सिद्धांत यांच्यात पेâबू्रवारी २०२१ मध्ये ओळखी झाली होती. त्यानंतर सिद्धांतने तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. परंतू तुरूणीने त्याला नकार दिल्यामुळे त्याने बदनामीची भिती दाखवून पैशाची मागणी केली. तिच्यासोबतचे असलेले फोटो फेसबुकवर व्हायरल केले. त्या फोटोचे व्हिडीओ तरुणीच्या नातेवाईक व इतरांना दिसतील अस टाकून तिची बदनामी करत तिचा विनयभंग केला. तरुणीने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याने तरुणीचा सतत पाठलाग करून त्रास दिला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस अधिक तपास करत आहेत.

महिलेला मिठी मारून विनयभंग
पुणे- महिलेच्या घरात घुसून तिचा मिठी मारत विनयभंग केल्याचा प्रकार धानोरी परिसरात मुंजाबा वस्ती परिसरात घडला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पिडीत महिला घरात मुलाला क्लासला घेऊन जाण्यासाठी तयार करत होती. त्यावेळी अज्ञात त्यांच्या घरात शिरला. त्याने मुलास मारण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.