पुणे, १५ जून २०२१: – घरफोडीच्या गुन्हयात फरार असलेल्या दोन आरोपींना चंदननगर पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. त्यांच्याकडून ४४ हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. सुमित मोहन शिंदे (वय २२,रा. राजीव गांधी नगर,येरवडा ) आणि ऋतिक दत्ता सारगे (वय १९ , रा. सुरक्षानगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
घरफोडीच्या गुन्हयातील आरोपी चंदननगर भाजी मंडई, शिवाजी पुतळा येथे येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी साध्या वेशात थांबून सापळा रचला. संशयीत आरोपी दुचाकीवर दिसताच पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र आरोपी पळुन जावुन लागले असता, पथकाने त्यांचा पाठलाग करुन थोडया अंतरावर पकडले. त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत ४४ हजार रूपये विंâमतीचे दागिने मिळून आले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव , पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, युसुफ पठाण, राजेश नवले, अमित जाधव, तुषार भिवरकर, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, सुभाष आव्हाड, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर यांच्या पथकाने केली.
More Stories
पुणे: सिव्हील सर्जनसह दोन वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पुणे: उपायुक्तांकडे कोट्यावधीचे घबाड, एसीबीकडून दाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखल
पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे