पुणे: येरवड्यात सायकलस्वार तरूणाचा मोबाइल हिसकाविला

पुणे, दि. २८/०७/२०२२: दुचाकीस्वार तिघा चोरट्यांनी सायकलस्वाराला अडवून त्याच्याकडीत १४ हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. ही घटना २५ जुलैला रात्री साडेसातच्या सुमारास येरवड्यातील क्लोवर गार्डन सोसायटी परिसरात घडली.

देव वर्मा (वय २३ रा. मुंढवा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तिघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देव वर्मा हे २५जुलैला येरवड्यातील क्लोवर गार्डन सोसायटी परिसरातून सायकलवर चालले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी त्यांना थांबवून धमकावित हातातील १४ हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर तपास करीत आहेत.