पिंपरी चिंचवड, ३० जून २०२५: महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती करण्याचा निर्णय अखेर रद्द केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण राज्यभरात आनंदाची लाट पसरली असून, पिंपरीतील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले, “माझ्या मराठीची बोलू कौतुके, अमृतापेक्षा पैज जिंके”— या ओळींमधून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचं जे महत्त्व अधोरेखित केलं, ते आजही तितकंच प्रासंगिक आहे. हिंदी सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी महामोर्चा काढण्याचे आवाहन केले होते. जनतेच्या प्रचंड पाठिंब्यामुळे आणि वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अखेर निर्णय मागे घेतला. हा विजय भाषिक अस्मिता आणि लोकशक्तीचा आहे. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांवर लादलेली जबरदस्ती जनतेच्या आवाजापुढे झुकली, ही विजयगाथा सर्व मराठी मनाची आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी स्मारक परिसरात जल्लोषात फटाक्यांची आतषबाजी करत, नागरिकांना लाडू-पेढे वाटून आनंद व्यक्त केला. परिसरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले.
या प्रसंगी मनसे पदाधिकारी सीमाताई बेलापूरकर, बाळ दानवले, मनोज लांडगे, रुपेश पटेकर, दत्ता देवतरासे, आदिती चावरिया, वैशाली निजामपूरकर, वैष्णवी पंडित, विद्या कुलकर्णी, श्रीकांत पाटील, गणेश शिंदे, राजेश अवसरे, नितीन चव्हाण, नितीन सूर्यवंशी, गोरक्ष मदने, हनुमान उगले, सूर्यकांत काळे, आकाश सागरे, राजू भालेराव, देवेंद्र निकम, नाथा शिंदे, सखाराम मटकर, नारायण पठारे, जयसिंग भाट, संजय मरकड, रोहित थोरात, तुकाराम शिंदे, मयूर हजारे, अण्णा कापसे, आकाश चव्हाण, शरण्य पाटणे, जय सकट, विकी कांबळे, उमेश शिनगारे, विजय मस्के, प्रबुद्ध कांबळे तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
Pune: चाकण भागातील सव्वादोनशे अतिक्रमणावर हातोडा
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १४१ शाळांमध्ये आफ्टर-स्कूल मॉडेलची सुरुवात
PCMC: ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन मालमत्ता कर भरा आणि मिळवा ४ टक्के सवलत!