पुणे: संक्रांतीनिमित्त सूती मांजा आणि पतंगाचे वाटप, मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन चा उपक्रम

पुणे १४ जानेवारी २०२३ : मकर संक्रांति निमित्त पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो. मात्र यामध्ये घातक चिनी मांजा वापरला जात असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत आणि त्यांचा जीव ही जात आहे. त्यामुळे मुकुंद माधव फाउंडेशन अनेक क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे कोरफड भागातील वस्तीमध्ये सुती मांजा चे वाटप करण्यात आले.

 

संक्रांती पासून उत्तरायन सुरु होते आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या काळात मोकळ्या हवेत जावे, जास्तीत जास्त सूर्यकिरण शरीरावर पडावेत या उद्देशाने पतंग उडविण्याची परंपरा असल्याचे माजी नगरसेविका आणि शिक्षण मंडळ अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने मोफत पंतग व मांजा वाटपाच्या उपक्रमात त्या बोलत होत्या. एरंडवणे परिसरातील दहा चाळ, पंडित जवाहरलाल नेहरू वसाहत, राजश्री शाहू वसाहत, सात चाळ अश्या विविध वस्त्यातील मुलांना पतंग उडविण्याचा निर्भेळ आनंद मिळावा आणि त्यांना सूर्यस्नान घडावे यासाठी हा उपक्रम करत असल्याचे मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी,योगेश रोकडे आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.यावेळी सौ. कल्याणी खर्डेकर, श्री.राजेंद्र येडे, श्री.सुनील होलबेले, संगीताताई आधवडे,संगीताताई वांद्रे,कोंडेताई, नागरिक व मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्याला सणाचा आनंद लुटायचा आहे पण त्याचा कोणाला त्रास होऊ नये याची देखील काळजी घ्यायची आहे असे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. चिनी मांज्यामुळे पक्ष्यांनाच नव्हे तर सामान्य नागरिकांना ही इजा झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत त्यामुळे पतंग उडविताना काळजी घ्यावी व रस्त्यावर पतंग न उडविता मोकळ्या जागेत उडवावेत असे आवाहन ही मंजुश्री खर्डेकर यांनी केले आहे.

पतंग वाटपाच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे लहान मुलं प्रचंड आनंदली होती व त्यांचा उत्साह ओसंडून वहात होता.