पुणे: अनाथ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ वाटप

पुणे,२ जुलै २०२१ :- शहरातील पाषाण परिसरातील संध्यानगरमधील श्री गणेश मित्रमंडळाचे कार्यकर्ते कै.गणेश रामेश्वर आप्पा घनचक्कर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोन अनाथ आश्रमांमधील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आला. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेने तसेच अनाथ मुलांनाही जीवनात आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी मिळावी या हेतूने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अनिकेत सेवाभावी संस्था संचलित मतिमंद मुलामुलींचे निवासी पुनर्वसन प्रकल्प बावधन पुणे, तसेच वडगाव बुद्रुक येथील आजोळ आनाथ आश्रमातील मुलांसोबत कै. गणेश यांचा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमास श्री गणेश मित्र मंडळ , स्वराज प्रतिष्ठान ( संध्यानगर , सोमेश्वरवाडी,पाषाण पुणे .) या मंडळाचे सर्व सभासद कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळाचे वरिष्ठ कार्यकर्ते, झुंजार न्यूज चॅनल चे संपादक संतोष काळे, सतीश जाधव, विक्रम शिंदे, पंकज चव्हाण, अभिजीत कोरके,अक्षय सावंत, विजय कुटे, कौस्तुभ तिडके,बाजीराव बोरुळे,सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रम घेतले जातात तसेच मंडळाचे कार्यकर्ते सचिन जाधव, शंभो जाधव, आयुष पिंगळे, कृष्णा गमे, कार्तिक शिंदे, रामेश्वर वाघमारे, कुणाल शिंदे, गणेश भालेराव, तेजस शेवणे, ओम कोने, सूरज देवकाते, शोएब कोतवाल, आलोक राखपसरे, अमोल भोसले, सहील कुलकर्णी, मुकुंद पवार, आकाश देवकर हे या उपक्रमात सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी यापुढे आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करून सामाजिक कार्याला मदत करणार, असा निर्धार केला.