December 19, 2025

पुणे : विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विजयस्तंभ परिसराची पाहणी

पुणे, १७ डिसेंबर २०२५ : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विजयस्तंभ परिसरास भेट देऊन पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल, समाज कल्याण आयुक्त दीपा मुंडे, बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी चंद्रकांत वाघमारे, पुणे ग्रामीण पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, समाज कल्याण उपायुक्त वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त तथा बार्टीचे निबंधक विशाल लोंढे, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, तहसीलदार तृप्ती कोलते, लोणीकंद पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी वाहनतळ आणि इतर सोयीसुविधा स्थानिक ठिकाणांना भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. विजयस्तंभ परिसरात नियोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोयीसुविधा उपलब्ध करणे, सुरक्षितता आणि कार्यक्रमाच्या सुरळीततेसाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.

यावेळी पोलीस विभाग, विविध प्रशासकीय विभाग आणि संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते.