पुणे, दि.०६/११/२०२२ – माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीचा शारिरीक छळ करून तिला सिगारेटचे चटक देउन पतीने तीनवेळा तलाक म्हणत घरात कोंडून घेतले. ही घटना २१ ऑक्टोबरला लोहगावमध्ये घडली आहे.
याप्रकरणी फारूख शेख वय ३१, शकशावली शेख, नुरजहा शेख , शब्बीर शेख, आयेशा शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २२ वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे आणि फारूखचे नोव्हेंबर २०२१ मध्ये लग्न झाले आहे. तेव्हापासून फारूख आणि त्याच्या कुटूंबियांनी महिलेचा शारिरीक व मानसिक छळ केला. तिचा गळा दाबून मारहाण करीत खूनाचा प्रयत्न केला. त्याशिवाय गालावर सिगारेटचे चटके देउन तीन वेळा तलाक म्हटले. त्याने पत्नीला घरात कोंडून कुलूप लावले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शिळमकर तपास करीत आहेत.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा