पुणे, ११/०८/२०२१: मोटार मागे घेत असताना झोपलेल्या एका कुत्र्याच्या डोक्यावरून चाक गेले. त्यामुळे झालेल्या अपघातात कुत्रा ठार झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास बंडगार्डन रस्त्यावरील डुंगरसी पार्वâ सोसायटीजवळ घडली. याप्रकरणी शहरातील नामांकित रूग्णालयाच्या महिला डॉक्टरविरूद्ध कोरेगाव पार्वâ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास महिला डॉक्टरला कोरेगाव पार्क परिसरातील बंडगार्डन रस्त्यावरून रूग्णालयात जायचे होते. त्यानुसार महिला डॉक्टर मोटारीत बसून गाडी मागे घेत होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीजवळ झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावरून चाक गेले. त्यामुळे कुत्रा गंभीररित्या जखमी झाला. त्यामुळे संबंधित महिला डॉक्टरने खाली उतरून पाहणी केली असता, कुत्रा गंभीररित्या जखमी झाला होता.
त्यावेळी परिसरात जमलेल्या नागरिकांनी महिला डॉक्टरला कुत्र्यांची देखभाल करतो, तुम्ही निघून गेला तरी चालेल असे सांगितले. त्यामुळे डॉक्टर रूग्णालयात निघून गेल्या. दरम्यान, कुत्र्याच्या भुंकण्यामुळे परिसरात राहणाऱ्या प्राणीप्रेमी महिलेने कुत्र्याला जवळच्या डॉक्टरांकडे नेले. मात्र, उपचारापुर्वीच कुत्र्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्राणीप्रेमी महिलेच्या तक्रारीनुसार महिला डॉक्टरविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विशाल म्हेत्रे तपास करीत आहेत.
More Stories
ठाण्याला हरवून पुणे उपांत्य फेरीत
अस्मयच्या हॅटट्रिकने लौकिक एफएचा विजय पीडीएफए फुटबॉल
एमएसएलटीए- पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सार्थ बनसोडेचा मानांकित खेळाडूवर विजय