वारजेत घरकामगारांनी लांबविले ७ लाखांचे दागिने

पुणे, दि. १५ (प्रतिनिधी) -घरमालकाने विश्वासाने दिलेल्या चाव्याचा गैरवापर करून महिला कामगारांनी त्यांच्या घरातून ७ लाख २० हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना काही महिन्यांपुर्वी वारजेतील इंडिका इमारतीत घडली आहे.

याप्रकरणी चंद्रसेन देशमुख (रा. वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रसेन कुटूंबियासह वारजेतील इंडिका इमारतीत राहायला आहेत. काही महिन्यांपुर्वी ते कामानिमित्त घराबाहेर गेले. त्यावेळी त्यांनी महिला कामगारांकडे विश्वासाने घराच्या चाव्या दिल्या होत्या. त्यानंतर संबंधित घरकामगार महिलांनी चावीद्वारे घर उघडून ७ लाख २० हजारांचे दागिने चोरून नेले.

परगावाहून माघारी आल्यानंतर चंद्रसेन यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आहे. त्यानंतर त्यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आर. व्ही. शेवते तपास करीत आहेत.