मद्यधुंद तरुणीचा टिळक रस्त्यावर गोंधळ

पुणे, दि. ४ (प्रतिनिधी) – शहरातील मध्यवर्ती टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक परिसरात एका मद्यधुंद तरूणीने मंगळवारी रात्री गोंधळ घातल्याची घटना घडली. याप्रकरणी नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून कळविल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरूणीला रस्त्याच्या बाजूला काढून ताब्यात घेतले.


मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास टिळक रस्त्यासर मद्यधुंद अवस्थेत असलेली तरूणी भररस्त्यात बसून गोंधळ घालत होती. वाहनांसमोर बसून वाहने अडविण्याचा प्रयत्न करत होती. तरुणीच्य प्रकारामुळे रस्त्यावर गर्दी झाली होती.

नागरिकांनी तत्काळ त्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलिसांना तत्काळ कळविण्यात आले. खडक पोलिसांनी धाव घेऊन तरुणीला रस्त्याच्या बाजूला काढले. तिला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात घेऊन गेले.