पुणे: लॉकडाउनमुळे कंपनीतील काम गेले, तरूण बनला सराईत चोरटा; तब्बल १७ दुचाकी जप्त

पुणे, २६/०८/२०२१: लॉकडाउनमुळे कंपनीतील काम गेल्यामुळे तरूणाने शहरासह   पिंपरी-चिंचवड आणि  ग्रामिण भागातून तब्बल १७ दुचाकी चोरी केल्या होत्या. संबंधिताला  गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. सम्या उर्फ समीर दत्तात्रय रांगावकर (वय ३४,रा. विमाननगर, मुळ रत्नागिरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून ४ लाख १० हजार रुपये किंमतीच्या १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.  समीर हा  सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सिंधुदूर्ग जिल्ह्यातही वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

लॉकडाउनमध्ये काम गेल्यानंतर संबंधित तरूणाने पुणे शहरासह पिंपरी आणि ग्रामीण भागातील दुचाीक चोरण्यास सुरूवात केली.  त्याने विविध भागातून १७ दुचाकी चोरल्या होत्या. यासंदर्भात गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर आरोपीच्या मुस्क्या आवळण्यात आल्या आहेत. – श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

नवी पेठ परिसरातून  सचिन घुले (वय.३०) यांची इंदुलाल कॉम्पलेक्सच्या पार्विंâगमधून दुचाकी चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार समांतर तपास सुरू असताना  गुन्हे शाखेच्या पथकाला  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एकजण दुचाकी घेउन चालल्याचे दिसून आले. संबंधित चोरटा  नवी पेठ निंबाळकरवाडा येथे येणार असल्याची माहिती पोलीस अमलदार शशीकांत दरेकर आणि दत्ता सोनावणे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली . त्याच्याकडून  १७ दुचाकी पोलिसांनी जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कामगिरी पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, इम्रान शेख, सतीश भालेकर, विजेसिंह वसावे, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, अजय थोरात, महेश बामगुडे,  अशोक माने, विजय थोरात, अनिकेत बाबार, तुषार माळवदकर राहूल मखरे, मिना पिंजण, रूकसाना नदाफ,यांनी केली.