पुणे: कारखान्याच्या छताचा पत्रा बसविताना पडून जेष्ठ ठार, मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा

पुणे, ११/०८/२०२१: कारखान्याच्या छताचा पत्रा बसविताना पडून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आण्णासाहेब निवृत्ती शिंदे (वय ६०, रा. कात्रज) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शिंदे यांचा मुलगा दत्ता शिंदे (वय ३५ ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार धरमसिंग नथुराम बन्सीवाल (वय ३९, रा. कोंढवा) या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येवलेवाडीत ३० जूनला घटना घडली होती.

आण्णासाहेब शिंदे हे बन्सीवाल यांच्याकडे कामाला होते. ३० जून रोजी येवलेवाडी येथे एका कारखान्याचा पत्रा बसविण्याचे काम सुरू होते. त्यावेळी शिंदे पत्रा बसवत असताना फायबरचा पत्रा तुटून ते खाली पडले. यामध्ये जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासात आरोपी बन्सीलाल याने कामगारांच्या सुरक्षितेतासाठी कोणतीही काळजी घेतली नसल्याचे दिसून आले. सुरक्षेसाठी जाळी बसविण आवश्यक होते. ती देखील बसविलेली नव्हती. त्यानुसार बन्सीलाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.