पुणे, ३१ जानेवारी २०२५: हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन ३ चे काम शाश्वत गतीने सुरू असून त्या अनुषंगाने या मार्गिकेवरील विद्युत पुरवठा विषयक कामकाज देखील वेगाने सुरू आहे. या अंतर्गत बाणेर रस्त्यावरून जाणाऱ्या मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी अत्यावश्यक बाब म्हणून १३२ केव्ही भूमिगत केबल्सचे काम करावयाचे आहे. त्यामुळे शिवाजीनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठ चौक, सेनापती बापट रोड इत्यादी परिसरातील विद्युत पुरवठा उद्या शनिवार, दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी या परिसरात सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत १३२ केव्ही गणेशखिंड उपकेंद्रातून होणारा विद्युत पुरवठा खंडित राहील, तरी नागरिकांनी या कामी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे मेट्रो लाईन ३ ची विकसक कंपनी असलेल्या पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडतर्फे करण्यात आले आहे.
पुणे मेट्रो लाईन ३ बाबत माहिती:
पुणे मेट्रो लाईन ३ हा हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारा २३ किमीचा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे. हा सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) प्रकल्प आहे, जो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) द्वारे टाटा समूहाच्या ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (TUTPL) आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स (Siemens Project Ventures GmbH) यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमला प्रदान करण्यात आला आहे. हा प्रकल्प डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) तत्त्वावर पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनी द्वारे ३५ वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी विकसित आणि ऑपरेट केला जाणार आहे.

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर