पुणे, २०/०९/२०२३: गणेशोत्सवात मध्यभागात जड वाहनांना प्रवेश बंद करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पाेलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले.
उत्सवाच्या कालावधीत मध्यभागात भाविकांची मोठी गर्दी होती. गणेश विसर्जनापर्यंत मध्यभागातील प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. दिवसा आणि रात्री मध्यभागातील प्रमुख रस्ते जड वाहनांसाठी बंद राहणार आहेत, असे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
जड वाहनांसाठी बंद असणारे रस्ते पुढीलप्रमाणे- लक्ष्मी रस्ता (संत कबीर चौक ते टिळक चौक, अलका चित्रपटगृह), केळकर रस्ता (फुटका बुरूज रस्ता ते अलका चित्रपटगृह), कुमठेकर रस्ता (शनिपार चौक ते अलका चित्रपटगृह), टिळक रस्ता (जेधे चौक ते अलका चित्रपटगृह), शास्त्री रस्ता (सेनादत्त पोलीस चौकी ते अलका चित्रपटगृह), कर्वे रस्ता (नळस्टाॅप चौक ते खंडोजीबाबा चौक), फर्ग्युसन रस्ता (खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक), जंगली महाराज रस्ता (स. गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक), छत्रपती शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा चौक ते जेधे चौक)
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन