पुणे,०६/०७/२०२१: सोशल मीडियाद्वारे तरूणींना भुरळ पाडून ओळख वाढवित त्यांच्या नातलग तरूणांना लष्करात भरती करण्याच्या आमिषाने तब्बल ५७ जणींना गंडा घालणाNया दादल्याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने चार जणींसोबत घरोबा करून आर्थिंक लुट करून तब्बल ५३ तरूणींसोबत लग्नाच्या आमिषाने बोलणी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
आतापर्यंत त्याने ५३ लाखांची फसवणूक केली आहे. योगेश दत्तू गायकवाड (रा. कन्नड, संभाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका तरुणीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी तरुणी मूळची आळंदी देवाची येथे राहत असून, जानेवारी २०२० मध्ये आईच्या उपचारासाठी बिबवेवाडीतील एका रुग्णालयात आली होती. त्यावेळी परिसरातील स्थानकावर बसची वाट पाहत असताना आरोपी योगेशचे आधारकार्ड तरुणीला मिळून आले होते. त्यावेळी तिने आवाज देत योगेशला आधार कार्ड दिले. त्यानंतर त्याने फिर्यादी तरुणी आणि तिच्या आईसोबत ओळख वाढविली. लष्करामध्ये असल्याचे खोटे ओळखपत्र दाखवून तरुणीच्या आईचा विश्वास संपादित केला. त्यानंतर तरुणीसोबत खोटे लग्न करून तिच्या भावाला लष्करात भरती करण्यासाठी २ लाख रुपये घेतले.
त्यानंतर तरुणीच्या गावातील तरुणांचा विश्वास संपादित करून योगेशने आतापर्यंत ५३ तरूणींसोबत ओळख वाढवून प्रत्येकी एक लाख रूपये प्रमाणे ५३ लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्याला सापळा रचून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, एपीआय राजेश उसगावकर, अमित पुजारी, सतीश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी, अतुल महांगडे, अमोल शितोळे, दीपक लोधा, राहूल कोठावळे यांच्या पथकाने केली.
असा करीत होता दादला फसवणूक
आरोपी योगेश मूळचा कन्नड तालुक्यातील असून, पुण्यातील विविध भागांत तो फिरत होता. बसस्थानकावर एकट्या तरुणींना गाठून विश्वास वाढवून मोबाईल नंबर घेत होता. त्याशिवाय सोशल मीडिया, विविध अॅप, पेâसबुक, इन्स्टाग्रामद्वारे ओळख वाढवून तरुणींना लग्नाचे आमिष दाखवित होता. त्यांच्या कुटुंबातील मुलाला लष्करात भरती करण्याच्या आमिषाने २ ते ३ लाख रुपये घेऊन पोबरा करीत होता. अशाप्रकारे त्याने ४ जणींसोबत घरोबा करून आर्थिंक गंडा घातला आहे. त्याशिवाय ५३ जणींसोबत प्रेमाचे नाटक करून त्यांच्याकडून प्रत्येकी १ लाख रूपये घेउन फसवूणक केली आहे.
“सोशल मीडियासह शहरातील विविध भागांत फिरून आरोपीने तरुणींना जाळ्यात अडविले आहे. त्यानंतर तरूणींचा मोबाईल नंबर, व्हॉट्सअॅपद्वारे चॅटिंग करून विश्वास वाढवून फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. आतापर्यंत त्याने ५३ तरूणींची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे” – राजेश उसगावकर, सहायक पोलीस निरीक्षक, बिबवेवाडी
More Stories
बेकायदेशीरपणे हुक्का पार्ट्यांचे आयोजन करणा-या बड्या हॉटेल्स आणि बारवर पोलिसांकडून कारवाई; तीन जणांविरुद्ध गुन्हा तर सुमारे 90 हजाराचा मुद्देमाल जप्त
डिएगो ज्युनियर्सचे अपराजित्व कायम, युपीएसएवर सहज विजय
एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18 वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अजमीर शेख, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद