पुणे: कोविड काळात पालकांना दिलासा देण्यासाठी नॅशनल पब्लीक स्कुलमध्ये विद्यार्थ्यांना फी माफी आणि सवलत

पुणे,६ जुलै २०२१ : अक्सा चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नॅशनल पब्लीक स्कुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी नर्सरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना टप्प्यानुसार फी माफी देण्यात आली आहे.


कोविड काळातील पालकांची हलाखीची स्थिती पाहून , सामाजिक भान ठेवून हा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. अक्सा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.तारिक अन्वर पटेल, मुख्याध्यापक अंजुम फिरदोस पटेल यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार, एल. के.जी., यु.के.जी. विद्यार्थ्यांना संपुर्ण फी माफी, आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ४० टक्के तर नववी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ४५ टक्के फी माफी देण्यात आली आहे. या सर्व विद्यार्थांना टप्प्या टप्प्याने फी भरण्याची सवलत देण्यात आली आहे.


नॅशनल पब्लीक स्कुल ही जाधवनगर कात्रज परिसरातील शाळा असून, याठिकाणी आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सामाजिक भान ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. पालकवर्गात त्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. शाळेला मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते राहुल जाधव यांनीही संस्थाचालकांचे अभिनंदन केले.