अखेर २३ गावांचा महापालिका हद्दीत समावेश राज्य सरकारने काढली अधिसूचना

पुणे, ३० जुन २०२१: महानगरपालिका हद्दीत २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत शासनाने अधिसूचना काढली आहे. शहरालगतच्या परिसराचाही पुणे शहराप्रमाणे विकास होण्याच्या दृष्टीने हा निर्णय मह्त्वाचा आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठीही राष्ट्रवादीसाठी ही निर्णय मह्त्वाचा ठरणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतीक्षित अशा २३ गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाल्याने या गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, या गावांच्या समावेशामुळे पुणे महानगरपालिका ही भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वांत मोठी महानगरपालिका झाली आहे. पुणे हे शहर महानगर म्हणून विकसित झाले असून, त्या धर्तीच्या सुविधा या नव्याने समाविष्ट २३ गावांतही लवकरच उपलब्ध होतील.

२३ गावांचा महापालिका हद्दीत समावेश व्हावा यासाठी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत बैठक घेतली होती, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा आदेश काढला आहे.
मार्च महिन्यात पुणे महापालिकेची निवडणूक होणार असताना हा निर्णय झाल्यामुळें नगरसेवक संख्या देखील वाढणार आहे.

ही आहेत २३ गावे
म्हाळुंगे, सुस, किरकिटवाडी, बावधन बुद्रुक पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नर्हे, होळकरवाडी, अवताडे हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळवाडी, नांदोशी,सणसवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली ही २३ गावे समाविष्ट झाली आहेत.