पुणे, दि. २६ (प्रतिनिधी) – सावकरी करत खंडणी उकळल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी ११ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सागर कल्याण राजपुत, जिग्नेशा सागर रजपुत, प्रभावती कल्याण रजपुत, राणी मारणे, अमित काळे, भुड्या व त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ५३ वर्षीय नागरिकाने याबाबत फिर्याद दिली असून हा प्रकार २०१८ ते २२ जुलै २०२१ दरम्यान घडला.
संशयीत आरोपींनी याप्रकरणात ५ लाख ५० हजारांच्या बद्ल्यात २५ लाख रूपये घेण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच व्याज हे मुद्दल रकमेत जमा करून ८५ लाख एवढी मुद्दल झाल्याचे सांगून त्यापोटी आंबेगाव बुद्रुक येथील १ हजार ७२० स्क्वेअरफुट जागचे जबरदस्तीने रजिस्टर्ड कुलमुखत्यारपत्र, नोटराईज्ड करारनामा व प्रतिज्ञापत्र करून घेतली आहे. फिर्यादीचा मित्र अमित उनेसा याच्याकडून देखील ७ लाख एवढ्या रकमेच्या बदल्यात त्याला जीवे ठार मारण्याच्या धमक्या देऊन शिवीगाळ करून त्यांच्या घरी हत्यारासह ७ ते ८ गुंडांना पाठवून त्याच्याकडूनही मोठ्या प्रमाणावर व्याज उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस तपास करीत आहेत.
More Stories
रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड’ च्या अध्यक्षपदी अमोल कागवडे ; पदग्रहण समारंभ संपन्न
मिळकतींची माहिती देताना लपवाछपवी
पुणे: डेक्कनमधील सराईत वर्षभरासाठी तडीपार