पुणे, १७ जून २०२५ : शहरात पावसाळयात नदीत पाणी सोडल्यानंतर अनेक भागात पूरस्थिती उद्भवते. या वेळी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्यासाठी महापालिकेडून ७१ ठिकाणी सोय करण्यात आली आहे. या ठिकाणांची यादी तसेच संपर्क क्रमांक महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत. या शिवाय, पावसाळयातील पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीसह १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये २४ तास सुरू असलेले नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तर, पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली असून त्यांना आवश्यक असलेली साधनसामुग्रीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहरात पावसाळयात दरवर्षी खडकवासला धरण भरल्यानंतर मोठया प्रमाणात मुठा नदीत पाणी सोडण्यात येते. या पूर्वी शहरात ३५ हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आल्यानंतर काही भागात पूर येत असे तसेच पूरामुळे नाल्याचे पाणी मागे येत असल्याने काही ठिकाणी पाणी घुसते. मात्र, गेल्या काही वर्षात अतिक्रमणांमुळे नदीची वहन क्षमता कमी झाल्याने २० ते २५ हजार क्यूसेक पाणी सोडल्यानंतरच पूरस्थिती उद्भवते.
———————————-
मुख्य पूर नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :
१) ०२०-२५५०१२६९
२) ०२०-२५५०६८००
३) ०२०-६७८०१५००
—————————————–
क्षेत्रीय कार्यालयांकडील तातडीच्या प्रतिसादासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकास उपलब्ध करून दिलेल्या साहित्यामध्ये जेटिंग मशीन – प्रत्येकी १, जेसीबी – प्रत्येकी १, युटिलिटी व्हेईकल – प्रत्येकी १, डिवॉटरिंग पंप – क्षेत्रीय कार्यालये व अग्निशमन विभाग मिळून एकूण ७७ पंप, रबर बोटी – ८ बोटी (विशेषतः पूरग्रस्त भागात मदत कार्यासाठी), रिसायकलर मशीन – गरजेनुसार
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार