September 11, 2025

Pune: साखर संकुल ते जुन्या पुणे-मुंबई रस्त्यांपर्यंत उड्डाणपुल

पुणे, २४ जुलै २०२५: शिवाजीनगर परिसरातील वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी नरवीर तानाजीवाडीतील साखर संकुलपासून थेट जुन्या मुंबई-पुणे रस्त्यांपर्यंत उड्डाणपूल करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.

फर्गुसन कॉलेज रस्त्यावरून न.ता वाडीवरून वाकडेवाडीकडे जाणार्‍या वाहनांना रेल्वे मार्गाखाली भुयारी मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, हा भुयारी मार्ग अरुंद असल्याने अनेकदा याठिकाणी कोंडी होते. तसेच मोठ्या वाहनांना थेट शिवाजीनगर जुन्या एसटी स्टॅड, संचेत मार्गे वाकडेवाडीला जावे लागते. त्यामुळे या भागात सातत्याने वाहतुक कोंडी होत असते. हा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेच्या वाहतुक प्रकल्प उभारण्यासाठी थेट साखर संकुलपासून रेल्वे मार्ग ओलांडून जाणारा उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यात साखर संकुलपासून निघाल्यानंतर वाकडेवाडीच्या दिशेने जाणार्‍या वाहनांसाठी एक लेन असेल तर रस्तां ओलांडून पुढे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दिशेने जाणार्‍या वाहनांसाठी एक लेन त्या दिशेला उतरविली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात वाकडेवाडी अथवा संगमवाडीकडून येणार्‍या एसटीच्या बसेस पुन्हा शिवाजीनगर बस स्थानकातून याच उड्डाणपूलावरून ये-जा करतील अशा पध्दतीचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर परिसरातील वाहतुक कोंडीचा प्रश्न उड्डाणपुलामुळे सुटण्यास मदत होणार आहे.