पुणे: मुलबाळासह आर्थिक सुबत्तेसाठी महिलेला स्मशानातील राख पाजली, हाडांची पावडरही लावली खायला

पुणे, दि. १९/०१/२०२३:  मुलबाळ होत नसल्यामुळे आणि घरात आर्थिक सुबत्तेसाठी विवाहितेला स्मशानभूमीतील राख पाण्यातून  देऊन fिपस्तूलाचा धाकाने  हाडांची पावडर खाण्यासाठी देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित कुटूंबियाविरूद्ध   सिंहगडरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयेश कृष्णा पोकळे, श्रेयश कृष्णा पोकळे, ईशा श्रेयश पोकळे, प्रभावती कृष्णा पोकळे कृष्णा विष्णू पोकळे ( सर्व रा. राधाकृष्ण व्हीला, पोकळे परडाईज, धायरी), दीपक जाधव आणि बबीता उर्फ स्नेहा जाधव ( रा. निगडी प्राधिकरण) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला  कम्प्युटर इंजिनिअर असून  एप्रिल २०१९  मध्ये त्यांचे जयेशसोबत लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसात सासरच्या मंडळीनी महिलेचा छळ सुरू केला. सासार्‍यांच्या मागणीनुसार महिलेच्या कुटूंबियांनी  जयेशला  सोन्याचे दागिने  गाडी घेण्यासाठी १० लाख रुपये दिले. काही दिवसानंतर त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाले.  घरामध्ये भरभराटीसाठी आणि महिलेला मूलबाळ होत नाही, यामुळे पोकळे कुटूंबियाकडून  अमावस्येला अघोरी कृत्य सुरू करण्यात आले. एका अमावस्येला रात्रीच्या वेळी  दिर, जाऊ, पती व सासुसासर्‍यांनी महिलेला स्मशानभूमीमध्ये  नेले.  तेथे जळालेल्या प्रेताची काही हाडे गोळा करीत राख मडक्यात घेतली.  त्यानंतर   स्मशानामधुन आणलेली राख पाण्यामध्ये मिसळून महिलेला पिण्यास दिले.
त्यानंतर  ११ फेब्रुवारी २०२१ ला  अमावस्येच्या दिवशी पूजा असल्याचे सांगुन तक्रारदार महिलेला निगडीत नेले. तेथे मांत्रिक महिलेने  पुजेच्या ठिकाणी बसण्यास सांगितले.  हाडाची पावडर करून   मात्रिक महिलेने तक्रादार महिलेला खायला सांगितली. त्यास नकार दिला असता   दिपक जाधव यांनी त्यांचेकडील रिव्हॉल्व्हर काढुन महिलेच्या डोक्याला लावुन  पावडर खाण्यास भाग पाडले. याप्रकरणी  सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव करत आहे.