पिंपरी-चिंचवड दि.१३/८/२०२२: वडगाव ग्रामपंचायतीमधील कातवी या गावाला पहिल्यांदा नगरसेवकपद मिळालं आहे. ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असूनही आत्तापर्यंत गावाला कुठलही पद मिळाले नव्हते. यावेळी गावातील श्रीधर धर्मनाथ चव्हाण यांना स्वीकृत नगरसेवकपद बिनविरोध निवड झाल्याने कातवी गावात जल्लोषाचं वातावरण आहे.
नगरपंचायतीचे माजी नगरसेवक भूषण मुथा यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर चव्हाण यांनी एकमेव अर्ज दाखल केला होता. त्यामुळे नगरपंचायतच्या विशेष सभेत नगराध्यक्षांनी श्रीधर चव्हाण यांची बिनविरोध निवड केली. गावाचं कुणीतरी नगरसेवक झाल्याने आता गावचा विकास व्यवस्थितरीत्या होईल असे गावकर्यांचे म्हणणे आहे. नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ढोरे यांनी चव्हाण यांची बिनविरोध नगरसेवक म्हणून जाहीर केले.
यावेळी विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, भाजपाचे गटनेते दिनेश ढोरे, नगरसेवक किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, प्रविण चव्हाण हे उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे, मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे, माजी उपसरपंच सुधाकर ढोरे, सोमनाथ काळे, माजी नगरसेवक विजय जाधव, शामराव ढोरे, युवामोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, किरण भिलारे, महिंद्र म्हाळसकर,संपत म्हाळसकर, मकरंद बवरे, शंकर भोडवे, दिपक भालेराव, नाथा घुले, संतोष पिंपळेसह ग्रामस्थ या सभेत उपस्थित होते. मान्यवर आणि ग्रामस्थांकडून चव्हाण यांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
More Stories
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे: दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त, सामुहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू
22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत तात्जाना मारिया व निगिना अब्दुरैमोवा यांच्यात अंतिम लढत