पुणे: बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक

पुणे, २२/०१/२०२३: बिटकॉईनमध्ये गुंतवणुक केल्यास तीन मिनिटात 30 टक्के रकमेसह पैसे परत करण्याचे आमिष दाखवून एकाला 5 लाख 21 हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मरिना शर्मा, अमदी यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अदित्तय हरीगोविंद पांडे (38, रा. गुडवील निर्मीती को ऑप सोसायटी, पोरवाल रोड, लोहगाव) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, लिओप्रडेबिट डॉट कॉम या वेबसाईवरील डिजीटल करन्सी प्लॅटफॉर्मवर बिटकॉईनमध्ये पैसे गुंतविल्यास तीन मिनटात 30 टक्के रकमेसह रक्कम परत करण्याचे आमिष दाखवून 5 लाख 21 हजारांची फसवणूक केल्याने तीन वेगवेगळ्या खाते धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक लहाने करीत आहेत.