पुणे ता.४/०१/२०२४: औंध रोड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवणे नियोजित आहे. यासबंधी सर्व प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर हा पुतळा येथे बसवावा तसेच येथे सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी आज आयुक्तांना भेटून दिले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, औंध रोड येथील आंबेडकर चौक येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याचे नियोजन पुणे महापालिकेमार्फत करण्यात आले आहे. यासाठी सर्व परवानग्या घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. हा पुतळा बसवण्यासाठी प्रशासकीय पूर्तता आणि टेंडर प्रक्रिया सुरु करण्यासाठी सबंधित अधिकाऱ्यांना आपण निर्देश द्यावेत. या पुतळ्याच्या चौथरा सुशोभीकरणासाठी महापालिकेकडून ५० लाख रुपयांची वित्तीय तरतूद करावी.
लवकरच महापालिकेचा अर्थसंकल्प तयार केला जाणार आहे. त्यामुळे या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करावी. अशी विनंती त्यांनी यावेळी आयुक्त विक्रम कुमार यांना केली. आयुक्तांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याची ग्वाही दिली आहे.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन