पुणे: जुगार अड्डयावर छापा, ११ जणांविरूद्ध कारवाई

पुणे, दि. १९/०१/२०२३ – जुगार अड्डयावर छापा टाकून सामाजिक सुरक्षा विभागाने ११ जणांविरूद्ध कारवाई केली. त्याठिकाणाहून ४३ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चंदननगर परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये  १८ जानेवारीला कारवाई करण्यात आली. संबंधितांविरूद्ध महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंदननगर परिसरात बेकायदेशिररित्या जुगार सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने १८ जानेवारीला छापा टाकून ११ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोकड,  मोबाईल व जुगाराचे साहित्य असा ४३ हजारांचा ऐवज जप्त केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार,  सहआयुक्त संदिप कर्णिक,  अपर आयुक्त रामनाथ पोकळे,  उपायुक्त अमोल झेंडे, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  विजय कुंभार  एपीआय अनिकेत पोटे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, हणमंत कांबळे, इम्रान नदाफ, पुष्पेंद्र चव्हाण यांनी केली.