पुणे: मुंढव्यात जुगार अड्डयावर छापा, २६ जणांविरूद्ध कारवाई

पुणे, दि. ०४/०१/२०२३ – सामाजिक सुरक्षा विभागाने मुंढवा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकला. जुगार खेळत असलेल्या २६ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली. त्याठिकाणाहून १ लाख ४ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.  आरोपींविरूद्ध महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमाने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांना मुंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मुंढवा परीसरात पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथ्ज्ञकाने त्याठिकाणी छापा टाकून २५ जणांना ताब्यात घेतले. जुगार खेळण्यासाठी आवश्यक साहित्य, मोबाइल, रोकड  असा १ लाख ४ हजारांचा  ऐवज जप्त करण्यात आला आहे.

 ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक,  अपर आयुक्त रामनाथ पोकळे,  उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील,  सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, अजय राणे, आण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण, संदीप कोळगे, अमित जमदाडे यांनी केली.