पुणे: आंबेगाव पठार परिसरात टोळक्याचा राडा, चार मोटारींची तोडफोड

पुणे, दि. २१/०८/२०२२ – रस्त्यावर उभ्या असलेल्या चार मोटारींची तोडफोड करीत १० ते १५ जणांच्या टोळक्याने आंबेगाव परिसरात राडा घातला.

 

ही घटना २० ऑगस्टला रात्री बाराच्या सुमारास स्वामीनगरमध्ये घडली.

गणेश रांजणे (वय ३१ रा. आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशने २० ऑगस्टला मोटार रस्त्यालगत पार्क केली होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या १० ते १५ जणांच्या टोळक्याने त्यांच्या मोटारीची काच फोडून नुकसान केले. त्याशिवाय कालीदास गायकवाड, नीलेश जाधव, नंदकुमार माने यांच्याही मोटारींची काच फोडून नुकसान केले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे तपास करीत आहेत.