पुणे, दि. २९/११/२०२२: गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला अमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली. त्याच्याकडून २ लाख १३ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये साडेसात किलो गांजा, दुचाकी, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वजनी काट्याचा समावेश आहे.
करणकुमार भरत राय वय २२ रा.गुरुदत्त कॉलनी,शिवाई चौक, जनता स्विट जवळ, कर्वेनगर, पुणे, मुळ रा. थाना डुमरा, गाव रसदपुर, जि सितामडी, राज्य बिहार असे अटक केलेल्याचे नाव आहे.
करणकुमार भरत राय वय २२ रा.गुरुदत्त कॉलनी,शिवाई चौक, जनता स्विट जवळ, कर्वेनगर, पुणे, मुळ रा. थाना डुमरा, गाव रसदपुर, जि सितामडी, राज्य बिहार असे अटक केलेल्याचे नाव आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक एक कोथरूड परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एकजण गांजा विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून करणकुमारला ताब्यात घेतले. त्याच्याकडून साडेसात किलो गांजा आणि इतर ऐवज जप्त केला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी गजानन टोम्पे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, एपीआय शैलजा जानकर, सुजित वाडेकर, मारुती पारधी, मनोजकुमार साळुंके, राहुल जोशी, संदिप शिर्वेâ पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, सचिन माळवे, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहना शेख, योगेश मोहिते यांनी केली.
More Stories
22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000 डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत जर्मनीच्या तात्जाना मारिया हिला विजेतेपद
पुणे विद्यापीठाचे ३० जानेवारीचे पेपर ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश