पुणे: सोने व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटणाऱ्या टोळीला अटक, तब्बल २० लाखांची रोकड ३० तोळे सोने जप्त

पुणे, २९/०८/२०२१: इन्कम टॅक्सचे अधिकारी असल्याचे सांगत सोने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याचे मोटारीतून अपहरण करीत तब्बल २० लाखांची रोकड आणि ३० तोळे लुटणाऱ्या टोळीचा भारती विद्यापीठ पोलिसांनी फिल्मीस्टाईल थराराचा पदार्पाश केला आहे. चोरट्यांकडून रोकड, दागिने, अलिशान मोटार, मोबाईल असा ३४ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही घटना २६ ऑगस्ट रात्री साडेनउ ते पहाटेपर्यंत जांभुळवाडी रस्त्यावर घडली.

मुख्य आरोपी व्यास गुलाब यादव (वय ३४, रा. आंबेगाव, मूळ- बिहार) भैय्यासाहेब विठठल मोरे, किरण कुमार नायर, मारुती अशोकराव सोळंके, ऊमेश अरुण ऊबाळे, शाम अच्युत तोरमल , सुहास सुरेश थोरात, रोहीत संभाजी पाटील, अशोक जगन्नाथ सावंत यांना अटक करण्यात आली. नंदकिशोर कांतीलाल वर्मा (वय ४१ रा. दत्तनगर) यांनी तक्रार दिली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी एसीपी सुषमा चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर उपस्थित होते.

नंदकिशोर हे सोने-चांदीचे व्यापारी असून २६ ऑगस्टला रात्री सव्वा नउच्या सुमारास गुन्ह्यातील मुख्य आरोपी मित्र व्यास यादव यांच्यासोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी अलिशान मोटारीतून आलेल्या पाचजणांनी नंदकिशोर यांना आम्ही इनकम टॅक्स अधिकारी आहे, तुम्ही इनकम टॅक्स भरत नाही, तुम्ही बेकायदेशीरपणे सोन्याचा धंदा करता, सरकारची फसवणुक करता तुमच्यावर इनकम टॅक्सची रेड आहे’ असे म्हणत दोघांना जबरदस्तीने मोटारीत बसवले. त्यानंतर त्यांना दूरवर नेत हत्यारांचा धाक दाखवून ७५ लाखांची मागणी केली. आरोपींनी त्यांना खूनाची धमकी देत त्यांच्याकडे २० लाख रुपये आणि ३० तोळे सोने आणण्यास सांगितले. त्यानुसार नंदकिशोर यांनी मित्र व्यास यादव याला घरी पाठवुन रोकड आणि सोने आणून चोरट्यांकडे दिले.

याप्रकरणी भारती विद्यापीठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करताना पथकाचे अंकुश कर्चे यांना नंदकिशोर यांचा मित्र व्यास यादव गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेउन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मित्र नंदकिशोर यांच्याकडे सोने व पैसे असल्याचे माहीती असल्यामुळे २५ दिवसांपुर्वी त्यांना लुटण्याचे ठरवले होते. त्यानुसार साथीदारांच्या मदतीने इनकमटॅक्स अधिकारी असल्याचा बनाव करून नंदकिशोर यांना साथीदारांच्या मदतीने लुटल्याचे सांगितले. तपासात इतर आरोपी कोल्हापुर परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. आरोपी देवगड-निपाणी हायवेवर थांबले असल्याचे दिसताच पथकाने त्यांच्या मोटारीचा पाठलाग केला.

पोलीस जखमी झाले पण आरोपींना नाही सोडले
आरोपी गाडी थांबवित नसल्यामुळे पोलीस अंमलदार हर्षल शिंदे आणि शिवदत्त गायकवाड हे गाडीला लटकले. त्याअवस्थेत चोरट्यांनी ५० मीटर कर्मचाNयांना फरफटत नेले. त्यानंतर पोलीस अंमलदार अभिजीत जाधव व विक्रम सावंत यांनी धावत्या गाडीच्या काचेवर हाताने जोरदार प्रहार केल्याने आरोपींनी मोटार थांबविली. अमंलदार हर्षल शिंदे किरकोळ जखमी झाले आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक पोलीस उपनिरीक्षक रविन्द्र भोसले, रविंद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर शिवदत्त गायकवाड यांनी केली.