December 3, 2025

Pune: कोंढवा खुर्दमध्ये १५ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकामावर हातोडा

पुणे, दि. १२ सप्टेंबर २०२५: पुणे महापालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधात आज कोंढवा खुर्द परिसरात मोठी कारवाई केली. शिवनेरी नगर, गल्ली क्रमांक १ येथे पाच मजली आणि चार मजली अशा दोन इमारतींचे सुमारे १५ हजार चौरस फूट आरसीसी बांधकाम पाडण्यात आले.

या कारवाईसाठी १० बिगारी, ५ पोलीस, १ जेसीबी, ४ ब्रेकर, २ गॅस कटर, ६ कनिष्ठ अभियंते व ३ उपअभियंते उपस्थित होते. कारवाईनंतर बांधकाम धोकादायक झाले असून, त्याचा वापर करु नये तसेच सदनिकांची खरेदी टाळावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

शहरात यापूर्वीही औंध, बाणेर, वडगाव शेरी, हडपसरसह विविध भागांत अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेने नागरिकांना इशारा दिला आहे की, परवानगीशिवाय झालेल्या बांधकामांमध्ये गुंतवणूक करू नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.