पुणे: मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम वाजवणारे हॉटेल रडारवर, येरवड्यात झापा बार ॲण्ड ग्रील हॉटेल व हायलॅन्ड हॉटेलवर कारवाई

पुणे, दि. २९/१२/२०२२ – मोठया आवाजात संगीत लावुन वाजवणाऱ्या येरवडा परिसरातील झापा बार ॲण्ड ग्रील हॉटेल व हायलॅन्ड हॉटेल कल्याणी नगर यांच्यावर सामाजिक सुरक्षा विभाग कारवाई केली. त्यांचे पावणे तीन लाख रुपयांचे साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त करण्यात आले.

कल्याणीनगर येरवडा परीसरात मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने झापा बार अॅण्ड ग्रील हॉटेल व हायलॅन्ड हॉटेल मध्ये पाहणी केली. त्यावेळेस मोठ्या आवाजात संगित सुरू असल्याचे आढळल्याने संबंधित हॉटेलवर कारवाई करून २ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सांउड सिस्टिम जप्त करण्यात आले . पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० चा नियम ५ चा भंग केलेबद्दल कारवाई करण्यात आली असुन जप्त मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, आण्णा माने, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर,इम्रान नदाफ, पुष्पेंद्र चव्हाण यांनी केली आहे.