पुणे, २६ जून २०२१: – राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाईन अभियानात सहभाग नोंदवत अनेक नागरिकांनी जातीव्यवस्था संपविण्यासाठी जोमाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. लोकायत, अभिव्यक्ती, युवा बिरादरी आणि स्पार्क (नागपूर) यांनी या सोशल मीडिया अभियानाचे आयोजन केले होते.
या अभियानामध्ये पुण्यासहित संपूर्ण महाराष्ट्रातून नागरिकांनी सहभाग नोंदविला. याअंतर्गत अनेक नागरिकांनी शालेय जीवनात जातीवरून आलेल्या अनुभवाने कसा आत्मविश्वास हरवला याबाबतच्या मनोगताचे व्हिडीओ, जातीपातिची बंधने तोडू, मानवतेशी नाते जोडू, असा आशय देणारे स्वरचित कविता-निवेदन, जातिभेद नाहीसे करण्याची सुरुवात उच्च म्हणावणाऱ्या जातीकडूनच झाली पाहिजे असे विविध संदेश पोस्टरवर लिहून ते हातात धरून फोटो काढून अभियानात अनेकांनी सहभाग घेतला. शाहू महाराजांचे जातीव्यवस्थेवरील कार्य सांगणारा पोवाडा रचून त्याचे गायनही करण्यात आले. जवळपास 60 लोकांनी यात सहभाग नोंदवला.
अभियानाचा एकूण प्रतिसाद पाहता हे अभियान करत राहू असे अभियानाचे समन्वय करणाऱ्या कल्याणी दुर्गा रवींद्र यांनी सांगितले.
More Stories
रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड’ च्या अध्यक्षपदी अमोल कागवडे ; पदग्रहण समारंभ संपन्न
मिळकतींची माहिती देताना लपवाछपवी
पुणे: डेक्कनमधील सराईत वर्षभरासाठी तडीपार