पुणे, 25/10/2025: गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुणे शहरातील विविध विषयी सातत्याने आरोप करत आहे.काल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माझ्यावर कोणताच गुन्हा दाखल नसल्याचं सांगितल्यावर आज रवींद्र धंगेकर यांनी ट्विट करत मोहोळ यांच्यावर किती गुन्हे दाखल असल्याचं सांगत जो पर्यंत जैन मंदिर दिमाखात उभी राहत नाही तो पर्यंत माझा हा लढा सुरू राहणार आहे.यात मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला तयार असून याची तयारी मी करून ठेवली असल्याचं यावेळी धंगेकर म्हणाले.
यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले की माझ्यावर जे गुन्हे दाखल आहे ते मी प्रतिज्ञापत्रक मध्ये दाखवलं आहे त्यांनी काल सांगितल की माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही.तसेच ते म्हणत आहे की कागदपत्र दाखवा आणि आत्ता त्यांनी निवडणुकीत जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे त्यातच ५ ते ६ गुन्हे दिसत आहे आणि ते कागदपत्रासह मी आत्ता ट्विट केलं आहे.तसेच जैन बोर्डिंग प्रकरणात जरी ते नाही म्हणत असाल तरी पुणेकर जनतेला कळत आहे यांनी बिल्डरांच्या पायी निष्ठा ठेवली आहे.ते बिल्डर धार्जिण असून ज्या जैन धर्माने त्यांना एवढी मते दिली आहे त्यांच्याबाबत एकही शब्द बोलत नाही अस यावेळी धंगेकर म्हणाले.
काही मंत्री मोहोळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे याबाबत धंगेकर यांना विचारलं असता ते म्हणाले की मुख्यमंत्री चाणक्श्र राजकारणी असून महाराष्ट्राचा कारभार पाहत असून त्यांना जैन धर्मियांना दुखावून जमणार नाही.ते स्वतःहा थोड्या दिवसात यांच्यावर कारवाई करतील तसेच माझ्या या लढाईत आज सर्व पुणेकर माझी साथ देत आहे अस यावेळी धंगेकर म्हणाले.

More Stories
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर
Pune: मेधा ताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही – रुपाली ठोंबरे पाटील