September 11, 2025

पुणे: दौंड गोळीबार घटनेत मी कोणताही दबाव टाकला नाही, कायद्यानुसार कारवाई व्हावी: आमदार शंकर मांडेकर

पुणे, २४ जुलै २०२५: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वाखारी येथील न्यू अंबिका कलाकेंद्रामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांचं भाऊ कैलास उर्फ बाळासाहेब हिरामण मांडेकर यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.आत्ता या प्रकरणी आमदार शंकर मांडेकर यांनी आपली प्रतिक्रिया देत या प्रकरणी मी कोणताही दबाव टाकला नसून कायद्यानुसार कारवाई व्हावी अस मी पोलिसांना स्पष्ट सांगितलं असल्याचं यावेळी मांडेकर यांनी सांगितलं.

यावेळी आमदार शंकर मांडेकर म्हणाले की खरं तर या प्रकरणाबाबत मला काहीही कल्पना नव्हती काल दुपारी मला पोलीस अधिकाऱ्यांच फोन आला आणि त्यांनी याबाबत माहिती दिली तेव्हा मी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितल की जे काही असेल ती रीतसर कारवाई करा ज्याने चूक केली असेल त्याच्यावर कारवाई होऊ द्या कायद्यानुसार जे काही होऊ ते होऊ द्या असं मी त्यांना सांगितलं.या प्रकरणी मी कोणताही दबाव टाकला नाही काय घडलं ते मलाही माहीत नव्हतं आणि पोलीसांनाही माहीत नव्हतं काळ काल मीच छोट्या भावाला सांगितल की जाऊन चौकीत जे कोणी असतील त्यांच्या समोर हजर व्हायचं तसेच जर कोणी चुकीचं काम केलं आणि तो माझा छोटा भाऊ जरी असला तरी मी हस्तक्षेप करणार नाही हे सगळ्यांना माहित असल्याचं यावेळी मांडेकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की माझ्या भावाकडे बंदुकीचा परवाना नसून त्याच्याकडे बंदूक नव्हती.ज्याची बंदूक होती तो मान्य करेल ना की कोणाची बंदूक आहे.माझ्या बारका भाऊ समाजकार्य करतो आणि शेती बघतो आणि समाजकारण करतो तसेच वारकरी संप्रदाय मधील आहे.तसेच कोणी कुठे जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो माझा भाऊ असून त्यांनी जर चुकीचा केला असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणारच असं यावेळी मांडेकर म्हणाले.