पुणे, दि.१२/०८/२०२३: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअंतर्गत स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन मंगळवार १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे सकाळी ९.०५ वा. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे.
ध्वजारोहण कार्यक्रमाच्या सुरक्षेच्यादृष्टीने पोलीस विभागाने दिलेल्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःचे शासकीय ओळखपत्र सोबत ठेवावे, त्यांच्यासोबत येणाऱ्या कुटुंबातील इतर सदस्य तसेच नागरिक यांना त्यांचे स्वतःचे छायाचित्र असलेले ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. ओळखपत्र बघूनच प्रवेश देण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासह इतर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खाजगी वाहनांना ओळखपत्र बघूनच प्रवेश देण्यात येणार आहे.
इतर खाजगी वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. वाहने सकाळी ८.१५ वाजेपर्यंतच प्रवेशद्वाराच्या आत सोडण्यात येणार असून त्यानंतर येणारी वाहने बाहेर लावावीत. खाजगी व्यक्तींना छायाचित्र असलेले ओळखपत्र अनिवार्य आहे, असे उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल यांनी कळविले आहे.
More Stories
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन
Pune: धनकवडी, औंध क्षेत्रात जोरदार अतिक्रमण कारवाई
Pune: संशोधक विद्यार्थ्यांची ही अवस्था तर बाकीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच काय?