पुणे: चैम्पियन स्पोर्ट्स येथील आगीची माहिती

पुणे, 16 ऑक्टोबर 2022 – आज सकाळी 08:20 वाजता अग्निशमन दलाकडे आग लागल्याची वर्दि मिळाली असता दलाकडून एरंडवणा अग्निशमन केंद्र येथील वाहन रवाना करण्यात आले होते. घटनास्थळी पोहोचताच अग्निशमन अधिकारी राजेश जगताप यांनी व जवानांनी पुढील कार्यवाही केली.

सदर ठिकाणी बेसमेंट, तळमजला + तीन मजली इमारतीच्या बेसमेंट मध्ये आग लागली होती. दलाची मदत पोहचताच आगीचे, धुराचे स्वरूप पाहाता अतिरिक्त मदत मागवण्यात आली, एरऺडवणा अग्निशमन केऺद्राकडील जवानांनी एक्झॉस्ट ब्लोअर चा वापर करून तसेच एका ठिकाणीच्या काचा फोडून धूर बाहेर काढत बी ए सेट चा वापर काला. बेसमेंटमध्ये प्रवेश करुन आगी वर पाण्याचा मारा सुरु केला व बेसमेंटमधे व्हेन्टीलेशन नसल्याने आग विझविण्यात अडचणी येत होत्या तरी एरऺडवणा, कसबा, कोथरूड या फायर गाड्या आणि मध्यवर्ती अग्निशमन केऺद्राकडील टँकरच्या साह्याने व तीन अधिकारी व पऺधरा जवानांच्या अथक साह्याने आगीवर पाऊण तासात कऺट्रोल करून, पुढील दहा मिनिटांत आग पूर्ण पणे विझवली, जखमी कुणीही नाही. सदर ठिकाणी वरिष्ठ अग्निशमन अधिकारी रमेश गांगड व गजानन पाथ्रुडकर यांनी सहकार्य केले.