पुणे, दि. १७/०४/२०२३: शहरासह जिल्ह्यातील विविध भागात घरफोडीसह वाहनचोरी करणार्या सराईताला खडकी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोडी करण्यासाठी तो मोटार आणि दुचाकी चोरी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. गणेश संजय पोळके (वय २१ रा. पाटील ईस्टेट, वाकडेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
संध्या संदिप बोरकर (वय ३८) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
संध्या यांची पर्स चोरुन नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी खडकी पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आलेला सराईत गणेश पोकळे हा पुन्हा चोर्या करीत असल्याची माहिती उपनिरीक्षक वैभव मगदूम यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने पाच गुन्ह्याची कबुली दिली.
ही कामगिरी अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त शशिकांत बोराटे, एसीपी आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, उपनिरीक्षक वैभव मगदुम, तानाजी कांबळे, उध्दव कलंदर, संदेश निकाळजे, मुजीब शेख, जहाँगीर पठाण, सुधीर अहिवळे, ऋषिकेश दिघे, अनिकेत भोसले, शिवराज खेड, विजय गिरासे यांनी केली.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार