पुणे, दि. ०५/०१/२०२३ – मौजमजा करण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून वाहनचोरी करणार्या सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सात दुचाकी आणि एक रिक्षा अशी साडेचार लाखांवर किंमतीची वाहने जप्त करण्यात आली आहे. राजेश प्रकाश परळकर (वय ३० रा. सुखसागरनगर, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
वाहनचोरी रोखण्याच्या अनुषंगाने भारती विद्यापीठ पोलिस हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एका रिक्षाचालकाचा संशय पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, राहुल तांबे, निलेश ढमढेरे यांना आला. पथकाने राजेश परळकर याला ताब्यात घेतले. त्याने ताब्यातील रिक्षा चोरीची असल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत त्याने भारती विद्यापीठ, सहकारनगर, हडपसर, जेजुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ७ दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, एपीआय अमोल रसाळ, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, अभिजीत जाधव, राहुल तांबे, निलेश ढमढेरे, सचिन सरपाले, शैलेश साठे, विश्वनाथ गोणे, चेतन गोरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, विक्रम सावंत, अशिष गायकवाड यांनी केली.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा