पुणे, २३/१०/२०२५: मॉडेल कॉलनी परिसरातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या (जैन बोर्डिंग) जागेच्या विक्रीव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे नेते माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार टिका केली जात आहे.आत्ता या जैन बोर्डिंगच्या ट्रस्टी यांनी या जागेच्या रीडेव्हलपमेंटसाठी महापालिकेत अर्ज केलं होतं आणि तो अर्ज आत्ता मंजूर देखील झाला असल्याची माहिती समोर आल्यानंतर माजी आमदार धंगेकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे तसेच जैन बोर्डिंगसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटी निधी देऊन तिथ चांगलं मंदिर उभाराव अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार पुणे शहरातील विविध प्रश्नांच्या संदर्भात माजी आमदार धंगेकर हे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या मंत्री यांच्यावर आरोप करत आहे याबाबत शिवसेनेकडून धंगेकर यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे याबाबत धंगेकर यांना विचारलं असता ते म्हणाले की मी भारतीय जनता पक्षावर कधीच टिका केलेली नाही जी विकृती आहे त्या विकृतीच्या विरोधात मी बोलत आहे.मागच्या आठवड्यात सुधीर मुनगंटीवार यांनी देखील माजी बाजू मांडली आहे.मी कुठेही पक्षावर बोलत नसून विकृतीच्या विरोधात बोलत आहे.माझी लढाई ही पुणेकरांची लढाई असून मी या विरोधात बोलत आहे.शिंदे साहेब जे आदेश देतील त्याच मी पालन करणार आहे.एका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांने सांगाव की मी भाजप विरोधात बोलत आहे मी माझं बोलणं थांबवणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितल.
सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडियोबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की तो एक टेलर असून त्याने मला सांगितल की माझ्यासाठी एक व्हिडिओ करा म्हणून मी तो एक व्हिडीओ केला आहे.गोरगरीब जनतेच्यासाठी मी तो व्हिडिओ केला आहे.अस यावेळी त्यांनी सांगितल एखाद्या गोरगरीब जनतेला जर माझ्या एका व्हिडीओमुळे फायदा होत असेल तर यात गैर काय आहे अस यावेळी ते म्हणाले.

More Stories
Pune: मेधा ताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही – रुपाली ठोंबरे पाटील
Pune: जैन बोर्डिंग जागा विक्रीव्यवहार प्रकरणाला जैसे थे ठेवण्याचे आदेश
Pune: पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ रंगणार २ ते १६ नोव्हेंबरदरम्यान