पुणे: हिंजवडी च्या मंदिरात जन्माष्टमी, गोपाळकाला उत्सव

पुणे, १८/०८/२०२२: हिंजवडी खिंडीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संकुलामध्ये असलेल्या कृष्ण मंदिरात 20 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे .डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी (वाराणसी ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा दुपारी दोन वाजता होणार आहे .मंदिराच्या संस्थापक बाळूबाई धुमाळ, दिलीप धुमाळ, रविकांत धुमाळ यांनी ही माहिती दिली. या जन्माष्टमी सोहळ्यात इस्कॉन संस्था देखील सहभागी होणार आहे