पुणे, २४ जुलै २०२५: २६ व्या कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून भारतमातेच्या रक्षणार्थ कारगिल युद्धामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता तसेच या युध्दामध्ये दिव्यांगत्व आलेल्या सैनिकांचा आणि शौर्य पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात येणार आहे.
सैनिक कल्याण विभाग येथे आयोजित शनिवार, २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी सैनिक कल्याण विभाग, पुणे आणि महाराष्ट्र कायदेशीर सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “नालासा वीर परिवार सहाय्यता योजना २०२५” ही एक नवीन योजना सुरु करण्यात येणार आहे. याअंतर्गत माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत व सक्षम कायदेशीर मदतीकरीता विधी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील अधिकाधिक वीरपत्नी, वीर माता-पिता, माजी सैनिक, आणि माजी सैनिकांचे अवलंबितांना उपस्थित रहावे, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे सतेश देवानराव (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
More Stories
Pune: साहसी प्रशिक्षण घेतलेल्या माजी सैनिकांनी माहिती देणेबाबत
खडकीत ४ ऑगस्टपासून अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन; विविध श्रेणींसाठी संधी
पुणे: राष्ट्रनिर्माणासाठी अनोखा पुढाकार – तीन हजार विद्यार्थ्यांना भारतीय सेनेत सामील होण्यासाठी मिळाले प्रोत्साहन