पुणे: तरूणाचे अपहरण करून कोयत्याने वार, १० ते १५ जणांविरूद्ध हडपसरमध्ये गुन्हा दाखल

पुणे, २१/०६/२०२१: भावाचा खूनाप्रकरणी तरूणाच्या मित्राचा हात असल्याच्या संशयातून सराईताने साथीदारांच्या मदतीने तरूणाचे अपहरण करून त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना पुâरसुंगीत घडली आहे. याप्रकरणी सराईत सागर घायतडक, किरण शिंदे, नयन कोळेकर यांच्यासह १० ते १५ जणांविरूद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार तुकाराम लोंढे (वय १८, रा. मांजरी ) यांनी तक्रार दिली आहे.

सराईत आरोपी सागर घायतडक याच्या भाउ अनिकेत घायतडक याचा काही दिवसांपुर्वी खून झाला आहे. संबंधित खूनप्रकरणी फिर्यादी ओंकार लोंढे याचा मित्र बंटी तुपे आणि शुभम मोडक यांचा हात असल्याचा संशय सागरला होता. त्याचा राग मनामध्ये धरून आरोपींनी काल दुपारी अडीचच्या सुमारास ओंकारचे अपहरण केले. त्याला पुâरसुंगी परिसरात नेउन त्याच्यावर कोयत्याने वार केले. याप्रकरणी हडपसर पोलिस तपास करीत आहेत.