किर्लोस्करच्या ‘लिमिटलेस’ मिशनमधून किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड, किर्लोस्कर चिलर्स प्रा. लि., किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड आणि किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये क्रांतीकारक बदल

पुणे, १६ जुलै २०२१: किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, किर्लोस्कर चिलर्स, किर्लोस्कर न्यूमॅटिक, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज आणि किर्लोस्कर इंडस्ट्रीज यांनी आपल्या व्यावसायिक स्वप्नांना ताजेतवाने केले आहे. हा रिफ्रेश केलेला दृष्टीकोन सातत्याने बदलत्या जगात भविष्यासाठी तयार होण्याच्या गरजेने जोडला गेला आहे आणि तो संपूर्ण ग्राहक प्रवासात अनुभव विस्तारित करण्याच्या इच्छेतून पुढे आला आहे.

या कार्यात फक्त व्यवसायांना उत्तमरित्या सुरू असलेल्या अभियांत्रिकी आस्थापनांचे, आघाडी घेणाऱ्या कंपन्यांचे आजच्या बदलत्या औद्योगिक क्षेत्रात व्यवसायातून पुनरूज्जीवन देणेच समाविष्ट नाही तर आधीपेक्षा जास्त प्रमाणात ग्राहक केंद्री होण्याचाही समावेश आहे.

आमच्या संस्थापकांच्या सर्व उत्पादने काळाच्या एक पाऊल पुढे असतील या स्वप्नाला अनुसरून आमच्या कंपन्या भविष्याकडे लक्ष ठेवून सातत्यपूर्ण पद्धतीने बदल घडवत राहतील.

या विस्तारीत दूरदृष्टीत ग्राहकांना एक वचन दिले जाते की, त्यांची स्वप्ने आता खरोखर अमर्याद आहेत आणि ती पूर्ण केली जातील.
हा अमर्याद दूरदर्शीपणा आठ व्यवसायांच्या क्षेत्रात उपयोगी ठरणार आहे. बी२बी कंपन्यांमध्ये वेगाने वाढीला चालना देत असताना बी२सी विभागातही त्यांनी आक्रमक योजनांचा पाया आखण्याचे नियोजन केले आहे. यात सर्व व्यवसाय क्षेत्रातील मागील २ ते ३ वर्षांमधील मोठ्या गुंतवणुकांचा समावेश असेल. त्यात नवीन तंत्रज्ञानांचाही समावेश केला जाईल, जो रिअल इस्टेट आणि एनबीएफसी यांच्यासह नवीन ऑफरिंग्सखेरीज असेल.

उज्ज्वल भवितव्य
ब्रँडची नव्याने स्थापित केलेली ओळख आणि रंग यांचा वापर या उपक्रमाचा भाग म्हणून केला जात आहे. यातील लोगोमध्ये मनुष्य केंद्रीभूततेचे घटक आणि भविष्यासाठीची सुसज्जता आहे आणि रंगांमधून मागील १३० वर्षांपासून या नावाने जपलेला आणि त्यांनी ज्यांच्या स्वप्नाला स्पर्श केला आहे ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दिलेल्या वर्षांचा वारसा दिसून येतो. नावीन्यपूर्ण विचारसरणी, सहानुभूती, सहयोग, एकात्मता, सर्वोत्तमता आणि मूल्यनिर्मितीची मूल्ये ही पुढे जात असताना विविध कार्यांमध्ये सखोलपणे रूजवली जातील.

या नवीन लोगोमधून आमच्या आमूलाग्र बदलाचे प्रतीक दिसते आणि अमर्याद भविष्याच्या दिशेने चाललेला प्रवास दिसतो. यात आय हे मानवी चिन्ह आहे आणि पुढे जाणारा बाण जो प्रगती आणि त्यांचा प्रभाव पडलेल्या लोकांची वाढ दर्शवतो. त्यातून हेही दिसून येते की, कंपन्या भविष्यासाठी सज्ज आहेत आणि त्या कायम ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. ही प्रेरणा दररोज बदलत्या कलर कॉपरमधून घेण्यात आली आहे. त्यामुळे कॉपर पॅटिना कलर पॅलेटचा वापर करण्यात आला आहे. चमकदार तपकिरी रंगांपासून गडद तपकिरी रंगापर्यंत, निळे आणि हिरवे रंग. टील हा या पॅटिनाचा शेवटचा टप्पा आहे. तो त्यातील प्रत्येक घटकाचे रक्षण करतो. तुम्ही आज पाहत असलेल्या ओळखीच्या रंगांमागील हीच प्रेरणा आहे.

आपला व्यवसाय अधिक मजबूत करण्यासाठी कंपन्या आपल्या नेतृत्वाचाही विस्तार करत आहेत. उद्योगातील दिग्गज अलीकडील काळात कंपनीत रूजू झाले आहेत. त्यात किर्लोस्कर इंडस्ट्रीजमध्ये महेश छाब्रिया, अरका फिनकॅपममध्ये विमल भंडारी, रिअल इस्टेट उद्योगासाठी विनेश जयरथ आणि किर्लोस्कर न्यूमॅटिकमध्ये के. श्रीनिवासन यांचा समावेश आहे. उद्योगातील दिग्गज आरव्ही गुमास्ते, संजीव निमकर आणि अविनाश मंजुळ हे किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि किर्लोस्कर चिलर्स यांचे अनुक्रमे नेतृत्व करतील.

या वारसा उद्योगांनी आपला अमर्याद प्रवास सुरू केला असून त्यांनी ३डी प्रिंटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, डिजिटायझेशन, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि इतर अनेक गोष्टींसारख्या नवीन युगाचे तंत्रज्ञान आणि प्रक्रियांचा अंगीकार सुरू केला आहे. या तंत्रज्ञानाचे फायदे व्यापक प्रमाणात पोहोचणारे आहेत- उत्पादने बाजारात आणण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यापासून ते खर्चातील मोठ्या बचतीपर्यंत.

नवीन ग्राहककेंद्री व्यवसायांमध्ये रिअल्टी व्यवसायात म्हणजे अवांते स्पेसेस आणि अर्का फिनकॅप या बिगर बँकिंग फायनान्स कंपनी (एनबीएफसी) मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाईल. अवांते स्पेसेस ही कंपनी ग्राहक केंद्री आणि भविष्याधारित तत्त्वांवर पुढे जाण्यासाठी आपल्या भूखंडांचा विकास करत आहे. हा व्यवसाय एका मिश्र विकासाच्या उत्पादनासाठी उत्सुक आहे, ज्यात स्मार्ट इमारतींमध्ये रिटेल आणि वाणिज्यिक क्षेत्रांचा समावेश आहे.

 

अर्का फिनकॅपची स्थापना मागील वर्षी किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या मालकीची कंपनी म्हणून करण्यात आली असून तिने १००० कोटी रूपयांच्या बीजभांडवलाद्वारे आपले काम सुरू केले. ती कॉर्पोरेशन्ससाठी रचनात्मक मुदत वित्त उपाययोजनांवर आणि एमएसएमई कर्जदारांना तसेच मालमत्ता बाजारांना कर्जे देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. पुढील तीन वर्षांत अर्का फिनकॅप रिटेल कर्ज आणि ग्राहक वित्ताचा व्यवसाय विकसित करेल.

या नवीन ओळखीबाबत बोलताना, किर्लोस्कल ऑइल इंजिन्सचे कार्यकारी अध्यक्ष अतुल किर्लोस्कर म्हणाले की, ”आम्ही एक पूर्णपणे एकात्मिक समूह कंपनी होण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. आमचे नवीन स्वप्न ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेते. आम्हाला उत्पादनांपासून त्याभोवतीच्या संबंधित उपाययोजनांसाठी प्रेरित करते. आम्ही एका शक्तिशाली अभियांत्रिकी उत्पादन कंपनीकडून भविष्यासाठी सुसज्ज कंपनीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. ती ग्राहकांच्या उत्तम अनुभवासाठी सज्ज आहे. आम्ही नवीन युगाच्या तंत्रज्ञान उपाययोजनांच्या आणि डिजिटलायझेशनच्या अंगीकारासाठी, तसेच भविष्यासाठी सज्ज टीम जी सर्वोत्तम कार्यपद्धतींसाठी तयार आहे आणि कामगिरी ओळखून पुरस्कृत करण्यासाठी सज्ज आहे, त्यांच्यासाठी उत्सुक आहोत.”

किर्लोस्कर न्यूमॅटिकचे कार्यकारी अध्यक्ष राहुल किर्लोस्कर म्हणाले की, “आम्ही जे काही करतो त्याच्या केंद्रस्थानी ग्राहक आहेत आणि आम्ही सातत्यने त्यांच्या अपेक्षांपलीकडे जाऊन काम करण्यासाठी बदल घडवून आणत आहोत. आम्ही आता आमची क्षितिजे विस्तारत आहोत आणि फक्त उत्पादनांकडून उपाययोजनांकडे, ग्राहक केंद्रीभूतता आणि आता डिजिटल रचनात्मकतेकडे पाऊल टाकले आहे. हा बदल आमच्या तत्त्वज्ञानात दिसून येतो. त्यातून आम्ही जास्त चांगले आयुष्य, अधिक चांगल्या संधी आणि आमच्या ग्राहकांसाठी तसेच समाजासाठी जास्त चांगले भवितव्य देण्यासाठी तयार असल्याचे दिसते.”

हा समूह भारताच्या औद्योगिक क्रांतीचा अविभाज्य घटक होता. तो आता भविष्याची नव्याने उभारणी करेल.