पावसामुळे महापालिकेच्या विकास कामांचे दावे पडले खोटे ; कोंढव्यातील रहिवासी नागरी समस्यांनी त्रस्त

पुणे, २६ जुलै २०२२: कोंढवा परिसरात पुणे महापालिकेकडून करण्यात आलेल्या विकास कामांचे दावे पावसाने खोटे ठरविले असून, परिसरातील रहिवासी विविध नागरी समस्यांनी त्रस्त झाले आहे. इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम बागवान यांनी नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडली आहे.

बागवान म्हणाले,” पुणे प्रभाग क्रमांक २७ कोंढवा खुर्द येथील शिवनेरी नगर ,भाग्योदयनगर मिठानगर,साईबाबानगर ४२ व इतर ठिकाणी लाखोंची निविदा भरून बनविलेले रस्ते आज खड्डेमय बनले आहेत. गटारी झाकणे तुटली आहेत. गेले पाच वर्ष काम कमी आणि कार्यक्षमतेचा ढिंढोराच जास्त वाजविला गेला. शिक्षणाची गैरसोय झाली असून, महानगरपालिका शाळेची अवस्था पाहण्या जोगी झाली आहे. शाळेत विदयार्थी संख्या जास्त असल्याने एकाच वर्गात अनेक इयत्तेचे विद्यार्थी बसवले आहेत.”

 

*हज हाऊस आश्वासन ठरले खोटे* :

 

विकास कामात केलेले दावे खोटे ठरले आहेत. ओटा मार्केट,लायब्ररी, मुस्लिम मते घेण्याकरीता उद्दघाटन करूनही पुर्ण न झालेले हज हाऊस,पाण्याची टाकी, सांस्कृतिक हॉल यावर माजी नगरसेवकांनी उत्तर द्यावे, अशी मागणी असलम इसाक बागवान यांनी केली आहे.